PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 27, 2024   

PostImage

भाऊंचे अस्तित्व पणाला ! अख्या महाराष्ट्राची नजर एकाच क्षेत्राकडे


देशात निवडणुकीचे बिगुल वाजले आणि राजकारण्यांपासून तर सामान्य माणसांमध्ये चर्चेला जाणारा विषय म्हणजे विजयी होणार कोण ?

संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा आणि ती म्हणजे चंद्रपूर लोकसभा निर्वाचीन क्षेत्राची,अन् कारणही तसंच आहे.राज्याचे वनमंत्री आणि विकासाचे महामेरू मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार म्हटल्यावर विषयच नाही,असं म्हणायला काहीच हरकत नाही.

आणि त्याच क्षेत्रात इंडिया आघाडीचे प्रतिनिधित्व करीत आहे. रणरागिणी विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर.हे दोन्ही मातब्बर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्या कारणाने अख्या महाराष्ट्राचे लक्ष याच लोकसभा क्षेत्राकडे लागले आहेत,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भाजपाचा बालेकिल्ला म्हणजे चंद्रपूर लोकसभा क्षेत्र आणि त्याच बालेकिल्ल्यात मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी भाजपाला चारही मुंड्या चित करून आपले वर्चस्व प्रस्थापित करून,आपले नाव लौकिक केला. कारण संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला एकच जागा जिंकता आली आणि तेही भाजपाच्या बालेकिल्यात आणि त्यांच्या निधनानंतर ह्याच क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून धानोरकरांच्या अर्धांगिनीने आता दंड थोपटल्या आहेत.

एकीकडे सुधीर भाऊंना भाजपाचे गड परत आणणे आणि देशाच्या संसदेत आपला आवाज बुलंद करणे,असा दुहेरी प्रवास करताना भाऊंसाठी ही लढाई अस्तित्वाची ठरणार आहे.

काँग्रेस उमेदवारांची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही,पतीच्या निधनानंतर लोकसभेचे नेतृत्व रणरागिणीकडे आल्यामुळे अस्तित्व पणाला लावणे भाग आहे.मे मेरी झांशी नही दूंगी, असंच म्हणण्याची वेळ आता प्रतिभाताईंवर आलेली आहे.

दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे कोण विजयी होणार ,हे येणारा काळ सांगेल.परंतु चंद्रपूर लोकसभा क्षेत्राकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे,हे मात्र नक्की.

||जगण्याचा पाया | चालण्याचे बळ | 

विचारांचे कळ | तुकाराम ||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 26, 2024   

PostImage

काँग्रेस पक्षाची गटातटाची मरगळ दूर सारल्या गेली तर,गतवैभव मिळवता येऊ …


गडचिरोली चिमूर लोकसभे करिता देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी कितीही वलग्ना करीत असले तरी परंतु गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील भाजपाच्या विद्यमान खासदाराचे कार्य पाहता.भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री नामदेवजी किरसान यांच्या रूपाने गतवैभव मिळवता येऊ शकतो.परंतु सर्वप्रथम काँग्रेस पक्षांमधील गटातटाचे राजकारना यावर अवलंबून न राहता किंवा मनात द्वेषाची भावना जरा बाजूला सारल्या गेली तर भाजपाच्या ताब्यात असलेला गड काबीज करून निर्विवाद यश संपादन करता येऊ शकतो.

कारण भाजपाचे विद्यमान खासदार श्री अशोक नेते यांनी लोकसभेवर दोनदा निवडून गेले परंतु जिल्ह्यात नेते साहेबांचे कार्य शून्यात असून काहीही विकास केलेला नाही.त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराबद्दल जनतेमध्ये नाराजी आहे आणि ती या निवडणुकीला दिसून येणारच आहे.आणि जनमानसात तशीच चर्चा देखील सुरू झालेली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार उच्चशिक्षित असून शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व ही त्यांची जमेची बाजू असून त्यांना विजयश्री खेचून आणायला कारणीभूत ठरू शकते. आणि जनतेला देखील बदलावा हवा आहे आणि तो होणारच आहे, ही आजची परिस्थिती आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 400 पार चा नारा देत असले तरी परंतु विद्यामन खासदाराच्या निष्काळजीपणामुळे ही निवडणूक भाजपाला डोकेदुखी ठरणार आहे.कारण विद्यमान खासदारांचा जिल्ह्यातील जनतेशी फारसा संबंध राहिलेला नाही किंवा ते टिकवू शकले नाही,हेच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते आणि जिथं खासदार महोदयांचा संबंधच तूटला असेल,तर तिथली परिस्थिती कशी असेल हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्याची गरज पडणार नाही.

काँग्रेस पक्षासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा वातावरण अनुकूल असून त्याचा फायदा कसं करून घ्यायचं हे मात्र काँग्रेस नेत्यांच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहे.हे मात्र सत्य आहे,कारण आजपर्यंतचा इतिहास बघितला तर जिल्ह्यातील काँग्रेसच्या गटबाजीमुळे उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि हे सत्य काँग्रेसचे नेते मंडळी सुद्धा नाकारू शकणार नाही.

भाजपाचा गड रोखायचा असेल तर सर्वप्रथम आपसातील वैर आणि गटागटातील मरगळ बाजूला फेकल्या गेली तर काँग्रेस पक्षाला गत वैभव प्राप्त करता येऊ शकतो अन्यथा भाजपा भाजी मारल्याशिवाय राहणार नाही.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 3, 2024   

PostImage

लोकसभा : भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी पुन्हा …


 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

 

भाजपच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवारांचं नाव घोषित करण्यात आलं नाहीय.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.

 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे, तर गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे

 

केरळमधून काँग्रेस नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा करताना, पत्रकार परिषदेत म्हटलं की, "प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून काही नावं आमच्याकडे आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत तिथल्या स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली."

 

29 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 195 जणांची पहिली यादी निश्चित करण्यात आल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडूणक लढतील, अशी माहिती तावडेंनी दिली.

 

तसंच, या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावं या यादीत आहेत. लोकसभा अध्यक्षांचं नावही या यादीत आहे, असं विनोद तावडेंनी सांगितलं.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण तसंच सबक साथ, सबका विकास यांचं उदाहरण गेल्या दशकभरात जगभरात प्रस्थापित केलं आहे.

 

“अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले. यावेळी एनडीए चारसौ पारचं उद्दिष्ट घेऊन पुढे जाण्याचं लक्ष्य पंतप्रधानांनी समोर ठेवलं आहे. जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने गेल्या दोन वेळेपेक्षाही प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल हा विश्वास आम्हाला आहे.”

 

भाजपच्या पहिल्या यादीतील मोठी नावं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.

 

मध्य प्रदेशमधील गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे.

 

राजस्थानच्या बिकानेरमधून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर कोटा इथून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देब यांनाही लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

 

मथुरेच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

 

लखीमपूर खिरीमधून अजय मिश्रा टेनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

उन्नावमधून साक्षी महाराज यांना उमेदवारी देण्यात आलीय, तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही पुन्हा एकदा अमेठीतून संधी दिली गेलीये.

-०-


PostImage

Today Latest News

Feb. 29, 2024   

PostImage

Loksabha Election 2024 : केरल में कांग्रेस 16 सीटों पर …


Loksabha Election 2024: कांग्रेस ने बुधवार को कहा कि पार्टी आगामी लोकसभा (Loksabha Election ) चुनाव में केरल में 16 सीटों पर चुनाव लड़ेगी और विपक्षी यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (United Democratic Front) (UDF) के भीतर सीटों के आवंटन को अंतिम रूप दे दिया गया है. इसमें कहा गया है कि पार्टी को अपने उम्मीदवारों के बारे में पहले से ही स्पष्ट समझ है और उनके नामों की घोषणा जल्द ही की जाएगी.

सबसे पुरानी पार्टी ने यह भी स्पष्ट किया कि गठबंधन में दूसरा सबसे बड़ा सहयोगी Indian Union Muslim League (IUML) इस बार एक और लोकसभा सीट आवंटित करने की व्यावहारिक कठिनाई के बारे में आश्वस्त है.

ये घोषणाएं UDF अध्यक्ष और विपक्ष के नेता वी डी सतीसन ने यहां एक संवाददाता सम्मेलन के दौरान कीं, जिसमें KPCC प्रमुख के सुधाकरन भी मौजूद थे. उन्होंने कहा, पिछले चुनावों की तरह, IUML आगामी लोकसभा चुनावों में दो सीटों - मलप्पुरम और पोन्नानी - पर चुनाव लड़ेगा। केरल की 20 लोकसभा सीटों में से कांग्रेस 16 सीटों पर चुनाव लड़ेगी, IUML- 2, KCJ (J) - 1 और RSP-1 पर चुनाव लड़ेगी। सतीसन ने कहा, "UDF के भीतर हुई चर्चा के अनुसार, कांग्रेस 16 सीटों पर चुनाव लड़ेगी, IUML मलप्पुरम और पोन्नानी में, RSP कोल्लम में और केरल कांग्रेस (जे) कोट्टायम में चुनाव लड़ेगी.

आईयूएमएल नेतृत्व ने हाल ही में स्पष्ट किया कि उन्होंने इस बार एक और लोकसभा सीट की मांग की और कहा कि वे अपने फैसले से पीछे नहीं हटेंगे।